भूमी मापन माहिती
जमीन मोजणी एकके सहजपणे समजून घ्या
भूमी मापन कॅल्क्युलेटर
रूपांतरित मूल्ये:
हेक्टर आणि चौरस मीटर
१ हेक्टर = १०,००० चौ. मी.
हेक्टर हे मोठ्या जमिनीच्या मापनासाठी वापरले जाणारे आंतरराष्ट्रीय एकक आहे.
एकर आणि गुंठे
१ एकर = ४० गुंठे
एकर हे ग्रामीण भागातील शेतीत वापरले जाणारे एक सामान्य एकक आहे.
गुंठा आणि चौरस फूट
१ गुंठा = ३३ फूट x ३३ फूट
= १,०८९ चौ. फूट
गुंठा हे महाराष्ट्रात वापरले जाणारे स्थानिक एकक आहे.
हेक्टर ते एकर
१ हेक्टर = २.४७ एकर
= ९८.८ गुंठे
हेक्टर आणि एकर यांच्यातील रूपांतरण मोठ्या जमिनींसाठी महत्त्वाचे आहे.
आर आणि गुंठा
१ आर = १ गुंठा
आर हे मेट्रिक एकक असून, व्यवहारात त्याला गुंठा मानले जाते. (लक्षात घ्या: तांत्रिकदृष्ट्या किंचित फरक असू शकतो.)
हेक्टर ते आर
१ हेक्टर = १०० आर
हे मेट्रिक प्रणालीतील एक सरळ रूपांतरण आहे.
एकर ते चौरस फूट
१ एकर = ४० गुंठे x [३३ x ३३]
= ४३,५६० चौ. फूट
एक एकरमध्ये एकूण किती चौरस फूट असतात हे यामुळे स्पष्ट होते.
चौरस मीटर ते चौरस फूट
१ चौ. मी. = १०.७६ चौ. फूट
मेट्रिक आणि इम्पीरियल प्रणालीतील हे एक मूलभूत रूपांतरण आहे.
जमीन मोजणी: एक संक्षिप्त परिचय 📜
मनूकाळापासून जमीन महसूल व जमीन मालकी या दोन्ही बाबींशी सामान्य जनतेचा संबंध आलेला आहे. वेळोवेळी राज्यसत्ता व समाज धारणा बदलत गेल्या. त्याप्रमाणे जमीन महसूल बाबतच्या पद्धती व नियम वेळोवेळी बदलत गेले. आजच्या भूमी अभिलेख विभागाचे स्वरूप ही त्याची परिणती आहे.
भूमी अभिलेख विभागाची सुरुवात ब्रिटिश कालावधीत झाली. १९२९-३० मध्ये झालेल्या मोजणीनंतर जमिनीचे असंख्य तुकडे पडले आहेत. जुन्या हद्दी व निशाण्याही नाहीशा झाल्या आहेत किंवा बुजल्या आहेत. अनेक गावात शेताच्या हद्दीबद्दल वाद निर्माण झालेले आहेत. कालांतराने त्या सर्व्हे नंबरमध्ये भाऊ वाटप, खरेदीविक्री, कोर्ट आदेश वगैरे कारणामुळे हिस्से पडले गेले. त्यावेळी राज्यामध्ये जमिनीचे अभिलेख संधारण करणे व ते अद्यावत ठेवणे यासाठी
