
या माहितीनुसार, जमिनीची मोजणी प्रक्रिया आता अधिक सुलभ आणि डिजिटल झाली आहे:
१. ऑनलाइन प्रक्रिया: मोजणी अर्ज पूर्णपणे ऑनलाइन असल्याने आता कागदपत्रे कार्यालयात नेऊन देण्याची गरज उरलेली नाही.
२. CAN आणि MRN नंबर: अर्ज भरल्यावर ‘CAN’ नंबर मिळतो, जो अर्जाची पोचपावती आहे. कार्यालयीन मान्यतेनंतर ‘MRN’ नंबर मिळतो, जो मोजणीचा अधिकृत नोंदणी क्रमांक असतो.
३. मोजणीचे विविध प्रकार: हद्दकायम (Boundaries), पोटहिस्सा (Sub-division), बिनशेती (NA), गुंठेवारी, सामिलीकरण आणि न्यायालयीन प्रकरणांसाठीच्या मोजणीची सुविधा यात उपलब्ध आहे.
४. शुल्क आणि कालावधी: मोजणीसाठी नियमित आणि जलद (द्रुतगती) असे दोन पर्याय आहेत. अर्जासोबत स्वतःचे ओळखपत्र आणि शेजारील किमान तीन खातेदारांची माहिती असणे अनिवार्य आहे.
१. ई–मोजणी व्हर्जन २.० आज्ञावली मध्ये ऑनलाईन मोजणी अर्ज केल्यानंतर त्याची प्रत संबंधित कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे का?
ई-मोजणी व्हर्जन २.० आज्ञावली मधील सर्व मोजणी अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑनलाईन असल्याने मोजणी धारकाने ई-मोजणी व्हर्जन २.० आज्ञावली मध्ये ऑनलाईन मोजणी अर्ज केल्यानंतर त्याची ऑफलाईन प्रत किंवा इतर कागदपत्रे संबंधित कार्यालयात जमा करणे गरजेचे नाही.
२. CAN Number म्हणजे काय?
CAN Number म्हणजे Citizen Application Number होय. मोजणी अर्जदाराने परिपूर्ण मोजणी अर्ज मोजणी फी सह ई-मोजणी व्हर्जन २.० आज्ञावली मध्ये भरल्यास Citizen Application Number हा नंबर प्राप्त होतो. CAN Number हा आपला अर्ज आज्ञावलीत भरल्याची पोच आहे.
३. MRN Number म्हणजे काय?
MRN Number म्हणजे Mojni Register Number होय. मोजणी धारकाकडून ऑनलाईन मोजणी अर्ज भरल्यानंतर संबंधित कार्यालयाकडून मोजणी अर्ज तपासून स्वीकारा केल्यानंतर त्या प्रकरणाला जो युनिक संदर्भीय नंबर आज्ञावलीद्वारे दिला जातो त्यालाच Mojni Register Number अर्थात MRN Number म्हणतात.
४. शासकीय मोजणी म्हणजे काय?
मा. जिल्हाधिकारी / सक्षम प्राधिकारी यांचे कडून प्राप्त आदेश पत्राचा अनुषंगाने शासकीय कामासाठी मोजणी करावयाची असल्यास शासकीय मोजणी या मोजणी प्रकारात मोजणी अर्ज करू शकतात.
५. मोजणी म्हणजे काय?
एखाद्या हितसंबंधीत धारकाला संस्थेला किंवा प्राधिकरणाला त्यांच्या सर्वे नंबर / गट नंबर / नगर भूमापन मिळकतीची रीतसर शासकीय मोजणी फी चा भरणा त्या तालुका मोजणी कार्यालयात करून सर्व हितसंबंधितांना नोटिस देऊन भूकरमापका मार्फत संबंधित जागेची प्रत्यक्ष मोजणी करून शासकीय अभिलेखानुसार हद्द निश्चिती करून मोजणी चा -क- प्रत मोजणी अर्जदारांना नकाशा पुरवणे या प्रक्रियेस मोजणी म्हणतात. ही मोजणी प्रक्रिया महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १३६ अन्वये केली जाते.
६. मोजणीची आवश्यकता का असते?
धारकाला स्वतःच्या मालमत्तेची हद्दीच्या सीमा निश्चित करणे, सीमेबद्दल वाद निर्माण झाल्यास, नवीन बांधकाम करायचे असल्यास, नवीन भूखंडाचे विभाजन करायचे असल्यास, आणि जमिनीच्या कागदपत्रांची अचूकता तपासण्यासाठी मोजणीची गरज असते.
७. नागरिकांना e-Mojni Version-2 आज्ञावलीत कोणते मोजणी प्रकार उपलब्ध आहेत?
हद्दकायम मोजणी, पोटहिस्सा मोजणी, बिगरशेती मोजणी, गुंठेवारी मोजणी सामिलीकरण मोजणी कोर्ट कमिशन मोजणी कोर्ट वाटप.
८. मोजणीसाठी किती खर्च येतो?
मोजणीसाठी लागणारा खर्च जमिनीचे नगरपालिका/महानगरपालिका चा आतील किंवा बाहेरील स्थान मोजणी अर्जदाराचा प्रकार व क्षेत्र आणि मोजणीचा कालावधी ह्यानुसार मोजणी फी ठरते.
९. हद्दकायम मोजणी म्हणजे काय?
नागरिकांना त्यांच्या भूमापन क्रमांक (सर्व्हे नंबर/गट नंबर/ नगर भूमापन मिळकत) ची हद्द शासकीय अभिलेखा प्रमाणे निश्चित करावयाची असल्यास नागरिकांनी हद्दकायम मोजणी प्रकारात अर्ज करावा. त्यानुसार कार्यालयामार्फत नागरिकांना अभिलेखाप्रमाणे येणाऱ्या भूमापन क्रमांक (सर्व्हे नंबर/गट नंबर) च्या हद्दी खुणा दाखविता येतात.
१०. पोटहिस्सा मोजणी म्हणजे काय?
नागरिकांना त्यांच्या भूमापन क्रमांक (सर्व्हे नंबर/गट नंबर/नगर भूमापन मिळकत) मध्ये (सामाईक) एका पेक्षा जास्त धारक असतील त्यांचे क्षेत्र व ७/१२ तसेच नकाशा वेगळे करून घ्यावयाचे असल्यास आपल्या हिश्याची पोटहिस्सा मोजणी करून घ्यावी. त्यानुसार पोटहिस्सा मोजणी परिपत्रकाप्रमाणे त्यांना वेगळा ७/१२ व नकाशा कार्यालयामार्फत कार्यवाही करून देण्यात येईल. नगरपालिका / महानगरपालिका / सक्षम नियोजन प्राधिकरण क्षेत्रातील पोटहिस्सा मोजणीसाठी संबंधित कार्यालयाकडून पोटहिस्सा करणे बाबतचा “तात्पुरता मंजूर अभिन्यास” आवश्यक आहे.
११. बिगरशेती मोजणी म्हणजे काय?
नागरिकांना त्यांच्या भूमापन क्रमांक (सर्व्हे नंबर/गट नंबर) ची हद्दकायम तसेच पोटहिस्सा मोजणीची कार्यवाही झाल्यानंतर सदर जमिनीचा उपयोग शेती व्यतिरिक्त रहिवास व वाणिज्यक वापर करणेकामी सक्षम प्राधिकारी यांचे मार्फत प्राप्त बिनशेती आदेश व रेखांकन मसुदा असल्यास तसेच मंजूर अभिन्यासा नुसार जागेवर सीमांकन असल्यास बिगरशेती मोजणी करता येईल.
१२. गुंठेवारी मोजणी म्हणजे काय?
परिपत्रकानुसार गुंठेवारी मोजणी मध्ये सक्षम प्राधिकारी यांचा स्थानिक प्राधिकरणाचा मंजूर गुंठेवारीचा आदेश व विद्यमान रेखांकनाचा आराखडा/नकाशा व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून गुंठेवारी मोजणी अर्ज प्राप्त झाल्यानंतर गुंठेवारी मोजणी करण्यात येते.
१३. सामिलीकरण मोजणी म्हणजे काय?
दोन किंवा अधिक जमिनीचे (सर्व्हे नंबर/गट नंबर/हिस्सा नंबर/नगर भूमापन नंबर) तुकडे एकत्र करून त्यांची एकत्रित मोजणी करणे पूर्वी झालेली मोजणीची नक्कल सोबत सामिलीकरण करत असलेल्या मिळकतीच्या सामिलीकरण करणे बाबतचा सक्षम प्राधिकारी यांचे आदेश व नकाशा सामिलीकरण साठी आवश्यक आहे.
१४. भूसंपादन मोजणी म्हणजे काय?
धरण, रस्ते, महामार्ग, तलाव आणि इतर सार्वजनिक उद्देशांसाठी शासन विविध जमीन धारकाकडून जमीन घेते अशा संपादनासाठी संबंधित भूसंपादन संस्थेसह विविध विभागाद्वारे नियमानुसार आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून संयुक्त मोजणी केली जाते. या नकाशामुळे जमिनीच्या भूभागाची अद्ययावत स्थिती समजते.
१५. कोर्ट कमिशन मोजणी म्हणजे काय?
नागरिकांना एखाद्या जमिनीच्या हद्दी संदर्भात वाद असल्यास अशा प्रकरणात मा. दिवाणी न्यायालयाकडून या विभागास कोर्ट कमिशन नेमण्यात येते. अशा प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, एखाद्या जमिनीची मोजणी करणे / हद्द निश्चित करणे त्यानुसार जमिनीची कोर्ट कमिशन मोजणी करून त्याबाबतचा अहवाल न्यायालयात सादर केला जातो.
१६. कोर्ट वाटप म्हणजे काय?
मा. जिल्हाधिकारी / तहसीलदार यांचे कडून आदेश प्राप्त झाल्यानंतर त्यामध्ये दिवाणी दावा दाखल करण्यात येतो नागरिकांना कोर्ट वाटप मोजणी प्रकारात मोजणी अर्ज करता येतो त्यानुसार कार्यालया मार्फत मोजणी काम पूर्ण करून तसा अहवाल मा. जिल्हाधिकारी / तहसीलदार यांचे कडे सादर करण्यात येतो.
१७. पुनर्भेट मोजणी म्हणजे काय?
मोजणी अर्ज कार्यालयामध्ये केला आहे त्यानुसार मोजणी तारीख लागली परंतु सदर मोजणी दिनांकास मोजणी काम न झाल्यास जागेवरील यापूर्वी दिलेल्या जबाब पंचनामा नुसार अर्जदार यांना पुन: मोजणी तारीख हवी असल्यास पुनर्भेट मोजणी शुल्क भरणे आवश्यक आहे. अशा वेळेस अर्जदाराने मोजणी अर्ज करताना भरलेल्या मोजणी शुल्काचा अर्धी रक्कम अथवा रक्कम रुपये १०,०००/- यापैकी जी कमी असेल ती चलन द्वारे अर्जदाराला पुनर्भेट मोजणी मध्ये जाऊन पुन्हा भरावे लागते.
१८. निमताना मोजणी म्हणजे काय?
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील तरतुदी नुसार कार्यालया मार्फत भूकरमापक / परिक्षण भूमापक यांनी केलेली मोजणी क प्रत अर्जदार, लगत कब्जेदार यांना मान्य नसल्यास व त्यांनी मोजणी बाबत नियमानुसार विहित मुदतीत तक्रार / हरकत दाखल केली असेल तर निमताना मोजणी (उच्चतपासणी) उप अधीक्षक भूमि अभिलेख / नगर भूमापन अधिकारी यांनी करावयाची असल्यास मूळ मोजणी प्रकरणी प्रत्यक्ष भरलेल्या मोजणी फी चा तीनपट दराने मोजणी फी आकारण्यात येते.
१९. सुपरनिमताना मोजणी म्हणजे काय?
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील तरतुदी नुसार उप अधीक्षक भूमि अभिलेख / नगरभूमापन अधिकारी यांनी केलेल्या निमताना मोजणी कामाबाबत अर्जदार, लगत कब्जेदार यांनी नियमानुसार विहित मुदतीत तक्रार / हरकत असेल तर तपासणी जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख या संवर्गातील अधिकाऱ्याकडून उच्च पातळीवर करण्यात येणाऱ्या निमताना मोजणीसाठी मोजणी फी चे दर मूळ मोजणी प्रकरणी प्रत्यक्ष भरलेल्या मोजणी फी चा पाचपट दराने आकारण्यात यावी.
२०. धारकाला मोजणी अर्ज भरतांना कोणती माहिती व कागदपत्रे अनिवार्य आहेत?
एखाद्या धारकाला गट नं/सर्व्हे नं./सिटी सर्व्हे नं. ची मोजणी करावयाची असल्यास त्याला स्वतःचे ओळखपत्र आणि ज्या गट नं/सर्व्हे नं./सिटी सर्व्हे नं. क्रमांकांची मोजणी करावयाची आहे त्या गट नं/सर्व्हे नं./सिटी सर्व्हे नं. मधील किमान तीन सह धारकांचे नाव, पत्ता व मोबाईल नंबर ची माहिती व मोजणी करावयाचा गट नं/सर्व्हे नं./सिटी सर्व्हे नं. च्या लगत तीन दिशांचा किमान एक धारकांचे नाव, पत्ता व मोबाईल नंबर ची माहिती मोजणी अर्जात भरणे आवश्यक आहे.
२१. मोजणी अर्ज सादर करण्यासाठी कालावधीनुसार कोणते प्रकार आहेत?
कालावधीनुसार मोजणीचे नियमीत व द्रुतगती असे दोन प्रकार उपलब्ध आहेत.
या नवीन माहितीमध्ये प्रामुख्याने दोन तांत्रिक गोष्टींवर प्रकाश टाकला आहे:
२२. मोजणीचा कालावधी: मोजणीसाठी अर्ज केल्यावर ती किती दिवसात पूर्ण होईल, हे तुम्ही निवडलेल्या पर्यायावर अवलंबून असते. ‘नियमित’ मोजणीसाठी ३ महिने (९० दिवस) लागतात, तर ‘द्रुतगती’ (Fast track) मोजणीसाठी साधारण १ महिना (३० दिवस) लागतो. मात्र, हा वेळ कार्यालयातील अर्जांची संख्या आणि उपलब्ध कर्मचारी यावर कमी-जास्त होऊ शकतो.
२३. मोजणीसाठी अर्ज केल्यानंतर किती दिवसांत मोजणी होते? नियमित मोजणी प्रकाराचा कालावधी हा साधारणपणे ९० दिवस व द्रुतगती मोजणी प्रकाराचा कालावधी हा साधारणपणे ३० दिवस इतका असून संबंधित कार्यालयातील मोजणी प्रकरणांची आवक व उपलब्ध भूकरमापक यावरती अवलंबून आहे.
२४. चलन हेड (Challan Head): ऑनलाइन फी भरताना चुकीचा हेड निवडल्यास तांत्रिक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे मोजणीच्या प्रकारानुसार योग्य हेड निवडणे गरजेचे आहे:
- 0029092801: हद्दकायम, कोर्ट कमिशन किंवा शासकीय हद्दकायम मोजणीसाठी.
- 0029123601: पोटहिस्सा, बिगरशेती, गुंठेवारी, सामिलीकरण, भूसंपादन आणि कोर्ट वाटप मोजणीसाठी.
२५. मोजणी अर्जदारांनी मोजणी प्रकारानुसार मोजणी चलन / फी भरतांना कोणता चलन हेड सिलेक्ट करणे आवश्यक आहे? मोजणी अर्जदारांनी हद्दकायम, कोर्टकमिशन किंवा शासकीय हद्दकायम मोजणी अर्ज करावयाचा असल्यास ००२९०९२८०१ प्रमाणे चलन हेड सिलेक्ट करावे. पोटहिस्सा, बिगरशेती, गुंठेवारी, सामिलीकरण, भूसंपादन, कोर्टवाटप किंवा शासकीय पोटहिस्सा मोजणी अर्ज करावयाचा असल्यास ००२९१२३६०१ प्रमाणे चलन हेड सिलेक्ट करावे.
अस्वीकरण: हा व्हिडिओ केवळ शैक्षणिक आणि जनजागृतीच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे. कायदेशीर स्पष्टीकरणांसाठी कृपया अधिकृत राजपत्राचा संदर्भ घ्या. कोणत्याही कायदेशीर निर्णयासाठी तज्ज्ञ वकिलाचा सल्ला नक्की घ्या.
